• Advertisement
 • Contact
More

  लॉयड्सच्या जीवघेण्या प्रदूषणाने नागरिकांचे जगणे कठीण

  नौशादशेख, घुग्घूस प्रतिनिधी, सर्च टिव्ही

  घुग्घुस : जिल्ह्यातील प्रसिद्ध औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुस येथील लोयड्स मेटल्स कंपनी आपल्या प्रदूषणा बाबत संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहे.

  या कंपनीतील परिस्थिती इतकी भयावह आहे की कंपनीत कार्यरत अनेक कामगारांना अपघातात जीव गमवावा लागला.

  आता पंधरा दिवसांपूर्वी कंपनीच्या विस्तारीकरणाची जनसुनावणी घेण्यात आली यामध्ये कामगार नेते सैय्यद अनवर यांनी प्रदूषणाच्या बाबतीत भरसभेत अत्यन्त कडक शब्दात कंपनीच्या जनसुनावणीला विरोध केला होता.
  मात्र कंपनी प्रदूषणाच्या बाबतीत सुधारण्याची मानसिकतेत नसल्याचे परत एकदा सिद्ध झाले
  आज सकाळच्या सुमारास कंपनीने अत्यंत जीवघेणा धूळ सोडला यामुळे कामगारांचे जीव गुदमरल्याची स्तिथी निर्माण झाली होती.

  एकीकडे जीव घेणे प्रदूषणावर नियंत्रण न करता दुसरीकडे विस्तारीकरणाचा डाव रचणाऱ्या कंपनीची पोल – खोल कंपनीतील कामगार अशपाक शेख यांनी केली होती हे विशेष