• Advertisement
 • Contact
More

  रोटरी व इनरव्हील क्लबचे कार्य कौतुकास्पद – महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे गौरवोद्गार

  रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्ट आणि इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्ट चंद्रपूरचा पदस्थापना सोहळा

  चंद्रपूर/
  रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्ट आणि इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले जात आहे. कोविडच्या काळात क्लबच्या माध्यमातून जनहितार्थ कार्य करून नागरिकांना मदत करण्याचे काम करण्यात आले. जितके कौतुक केले तेवढे कमीच आहे, असे गौरवोद्गार महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी केले.

  रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्ट आणि इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्ट चंद्रपूरचा पदस्थापना सोहळ्यात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.

  याप्रसंगी महापौर म्हणाल्या, या क्लबच्या माजी पदाधिकाऱ्यांनी कोरोनाचा काळात खूप चांगले काम केले आहे व नागरिकांना मदत केली आहे. या माध्यमातून सॅनीटायझर, मास्क तसेच इतर सोयीसुविधा लोकापर्यंत पोहोचविण्याचे काम सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच आता नवीन पदाधिकारी यांची नेमणूक झाली आहे. त्यांच्याकङूनही या क्लबच्या माध्यमातून जनहितार्थ कार्य करून नागरिकांना मदत करण्याचे काम सुरू आहे. आपल्या माध्यमातून जनहितार्थाचे काम नेहमीच सुरू राहावे व सर्वांना आपण मदत करावी, अशा सदिच्छा महापौरांनी व्यक्त केल्या. या क्लबच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे, त्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
  याप्रसंगी असिस्टंस्ट गव्हर्नर स्मीता ठाकरे, रोटरीचे मावळते अध्यक्ष अनिल व्यास, मावळते सचिव प्रदीप गादेवार, इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्टच्या मावळत्या अमृता ठाकरे, मावळत्या सचिव सोनल बुक्कावार, रोटरीचे नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र कंचर्लावार, नवनियुक्त सचिव रवी वासाडे, इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्टच्या नवनियुक्त अध्यक्ष डॉ. शितल बुक्कावार, नवनियुक्त सचिव सोनल बुक्कावार, माधवी कंचर्लावार, वर्षा कोतपल्लीवर आदींची उपस्थिती होती.