• Advertisement
 • Contact
More

  महाविकास आघाडीचे सरकार गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी संकल्पबद्ध – आमदार सुभाष धोटे. खावटी अनुदानातून राजुरा, गडचांदूर व कोरपना येथे लाभार्थींना अन्नधान्य किटचे वितरण.

  खावटी अनुदानातून राजुरा, गडचांदूर व कोरपना येथे लाभार्थींना अन्नधान्य किटचे वितरण.

  राजुरा :- खावटी अनुदान योजने अंतर्गत अनुसूचित जमाती कुटुंबांना साहाय्य करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे “अन्नधान्य किट वाटप” वितरण कार्यक्रम आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली गोपिकाबाई सांगडा आश्रमशाळा राजुरा, शासकीय आश्रम शाळा देवळा, स्वर्गीय भाऊराव पाटील आश्रम शाळा कोरपणा, स्वर्गीय भाऊराव पाटील आश्रम शाळा गडचांदूर येथे आयोजित करण्यात आले.
  या अंतर्गत राजुरा तालुक्यातील 2833, कोरपना तालुक्यातील 1912, जिवती तालुक्यातील 2886 गोंडपिपरी तालुक्यातील 1324 असे राजुरा विधानसभा क्षेत्रात एकूण जवळपास 7955 लाभार्थी आदिवासी कुटुंबियांना लाभ मिळणार आहे. किराणा स्वरुपात असलेल्या या किटमध्ये १२ वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे. यात मटकी, चवळी, हरबरा, वाटाणा, उडीद डाळ, तर डाळ, साखर, शेंगदाने तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती इत्यादींचा समावेश आहे.
  या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित लाभार्थी कुटुंबांना मार्गदर्शन करताना सांगितले की महाविकास आघाडीचे सरकार गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संकल्प बद्ध आहे. कोरोणाची परिस्थिती लक्षात घेता हे कीट गरजूंना जीवनदायी ठरणार आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी नागरिक असून जिवती तालुक्यात हे प्रमाण जवळपास ७५ टक्क्यांच्या आसपास आहे. खावटी अनुदान योजनेकरीता आश्रमशाळेच्या शिक्षकांच्या माध्यमातून लाभार्थ्यांचा शोध घेण्यात आला तसेच आदिवासींकरीता असलेल्या शबरी योजना, ठक्कर बाप्पा आणि इतर योजनेचे माध्यमातून आदिवासी बांधवांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा आमचा मानस आहे.
  या प्रसंगी राजुरा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, उपसभापती मंगेश गुरनुले, प स सदस्य तुकाराम माणुसमारे, कुंदा जनेकर, बामनवाडा च्या सरपंच भातरी पाल, देवळा सरपंच लक्ष्मीताई पंधरे, कोरपना येथे जि.प.सदस्य विनाताई मालेकर, कल्पनाताई पेचे, उपसभापती सिंधुताई आस्वले, श्यामभाऊ रणदिवे, उत्तमराव पेचे, सिताराम कोडापे, संभा पाटील कोवे, भाऊराव पाटील चव्हाण, नितीन बावणे, सुरेश मालेकर, संगीता पंधरे, रोशन आस्वले, गडचांदूर येथे नगराध्यक्षा सविता टेकाम विक्रम येरणे, आशिष देरकर, उमेश राजूरकर, संतोष महाडोळे, पापा आर्या, सतीश बेतावर, विलास मडावी, रुपेश चौधरी, अरविंद मेश्राम, शैलेश लोखंडे यासह स्थानिक आदिवासी बांधव, शिक्षक वृंद, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.