• Advertisement
  • Contact
More

    खर्रा आणण्यासाठी गेलेल्या वीवाहित महिलेवर अत्याचार

    चंद्रपुर (भद्रावती) -भद्रावती तालुक्यातील घोसरी येथे राहणाऱ्या 38 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी घडली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
    विनायक बबन नगराळे वय 42 राहणार घोसरी असे आरोपीचे नाव आहे पीडित महिला ही पानठेल्यावर खर्रा आनण्यासाठी गेली असता विनायक याने तू कुठे चाललीस असे विचारले व तिचा पाठलाग करून तिला बाजूच्या शेतात पकडून नेऊन तिच्यावर अत्याचार केला तिने आरडाओरड केली असता पीडितिचा पती व मुलगा आला असता आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला पीडित महिलेने भद्रावती पोलिसात तक्रार दाखल करतात ठाणेदार सुनील सिंग पवार यांनी आरोपीला अटक केली.