• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  महापौरांच्या नगरसेवक पतीची उपयुक्तांना जिवे मारण्याची धमकी गुन्हा दाखल

  चंद्रपूर :- चंद्रपूर महानगर पालिकेच्या कालच्या आमसभेत काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये चांगलाच राडा घडला. काँग्रेस व सत्ताधारी नगरसेवक आपसात भिडले यानंतर महापौर राखी कंचर्लावार यांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी उपायुक्त विशाल वाघ यांना अश्लिल शिवीगाळ करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. वाघ यांनी पोलिसात तक्रार केली असून संजय कंचर्लावार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  मनपाच्या आमसभेत आज गुरुवारी प्रचंड राडा झाला. काँग्रेस आणि भाजपने एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार केली. आमसभा आटोपल्यानंतर महापौर राखी कंचर्लावार यांनी उपायुक्त विशाल वाघ आणि अतिरिक्त विपीन पालीवाल यांना आपल्या कक्षात बोलविले. त्यावेळी महापौरांच्या कक्षात स्थायी समिती सदस्य रवी आसवानी, भाजपचे नगरसेवक देवानंद वाढई, चंद्रकला सोयाम, कल्पना बगुलकर आणि महापौरांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार उपस्थित होते. यावेळी महापौरांनी आमसभेतील गोंधळाच्या अनुषंगाने उपयुक्त वाघ आणि अतिरिक्त आयुक्त पालीवाल यांना काही सूचना केल्या. त्यानंतर कोणतेही कारण आणि अधिकार नसताना संजय कंचर्लावार यांनी मध्येच हस्तक्षेप केला. वाघ यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी संजय कंचर्लावार यांनी दिली.
  त्यानंतर वाघ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संजय कंचर्लावार यांचयावर गुन्हा दाखल केला आहे.
  पुढील चौकशी चंद्रपुर शहर पोलीस करत आहेत.