• Advertisement
 • Contact
More

  उदया ३१ मार्च पर्यंत ५० टक्के वीजबिल थकबाकीमाफीची संधी

  • नंतर मिळणार फक्त ३० टक्के माफी

  कृषिपंप वीजजोडणी धोरण-महाकृषि उर्जा धोरण २०२० अंतर्गत कृषिपंपधारकांना थकबाकीत सवलत देण्याच्या योजनेतून चंद्रपूर परिमंडलातील– चंद्रपूर व गडचिरेाली जिल्हयाचा समावेश असून एकंदरीत ४७ हजार८५० कृषिपंप ग्राहकांनी ५० कोटी २४ लाख रुपयांचा भरणा करीत थकबाकीमुक्तिच्या दिशेने पाउुले टाकले आहेत तर २४ हजार २२६ कृषिपंपधारकांनी २८ कोटीचा ८१ लाखाचा भरणा करुन आपले वीजबिल पूर्णत: कोरे करुन घेत या सुवर्णसंधीचा लाभ घेतला आहे. या सर्व कृषिग्राहकांना वीजबिल थकबाकीवर सूट, विलंब आकार व व्याज अशी एकत्रित ६६ कोटी ९२ लाखांची माफी मिळाली आहे. सर्व थकबाकीमुक्त कृषिपंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याचे प्रमाणपत्र महावितरणतर्फे देण्यात आले आहेत. थकबाकीमुक्त झालेल्या ग्राहकांनी थकबाकीमुक्त होत ही संधी उपलब्ध करुन दिल्याबाददल मा. उर्जामंत्री डॉ. . नितीन राऊत व महावितरणचे आभार मानले आहे.

  चंद्रपूर परिमंडलातील एकूण ८० हजार ग्राहकांना त्यांच्या सप्टेंबर २०२० पर्यंतच्या २३३ कोटीच्या वीजबिल थकबाकीवर १८ कोटी ६७ लाखाची सूट व सोबतच २१ केाटी ३६ लाख विलंब आकार व व्याज म्हणजे एकत्रितपणे ४० कोटी माफ होवून १९२ कोटी अशी सुधारीत थकबाकी निर्धारीत करण्यात आली आहे. या सुधारीत थकबाकीपैकी निम्मिच रक्कम म्हणजे ९६ कोटी योजनेच्या पहिल्या वर्षी ३१ मार्च पर्यंत कृषिग्राहकांनी भरायचे आहेत. ९६ कोटीची वीजबिलमाफी, वीजबिल थकबाकीवर १८ कोटी ६७ लाखाची निर्लेखनाद्वारे सूट व सोबतच २१ कोटी ३६ लाख विलंब आकार व व्याज म्हण

  जे एकत्रितपणे ४० कोटी ३ लाखाची असे एकत्रिपणे कधी नव्हे ती १३६ कोटीची माफी या योजनेमुळे चंद्रपूर व गडचिरेाली जिल्हयातील कृषिग्राहकांचे माफ होणार आहेत.

  या योजनेत अजूनही सहभाग न घेतलेल्या ३२ हजार १५५ कृषिग्राहकांना ३१ मार्च पर्यंत ५० टक्के वीजबिल थकबाकीमाफीची संधी आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत ही योजणा राबविण्यात येत असली तरी या योजणेच्या पहिल्या वर्षी सुधारीत वीजबिलावर ३१ मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के , मार्च २०२३ पर्यंत ३० टक्के तर मार्च २०२४ पर्यंत २० टक्के माफी मिळणार आह. त्यामुळे दारात चालून आलेली ही सुवर्णसंधी न गमावता ५० टक्के माफी मिळण्यास व पूर्णपणे थकबाकीमुक्त होण्याच्या दारात चालून आलेल्या या संधीचा लाभ घेवून कृषिपंपधारकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करण्याचे व योजणेचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता . सुनिल देशपांडे यांनी कले आहे.