• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  घँटा गाडी कर्मचाऱ्यांचे किमान वेतना साठी मनपा समोर धरणे आंदोलन

  चंद्रपूर महानगरपालिका मध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्या करिता सन 2015 पासून कार्य सुरू करण्यात आले, यात कचरा संकलन, घंटा गाड़ी चालक यांची कंत्राटी पदे भरण्यात आली मात्र कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटी घंटागाडी व वाहन चालक यांना किमान वेतनापासून वंचित ठेवण्यात आले.
  कामगारांनी वेळोवेळी किमान वेतनाबाबत पाठपुरावा केला मात्र चंद्रपूर मनपाने प्रतिसाद दिला नाही, अखेर फेब्रुवारी महिन्यात कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सुरू केले त्यावेळी मनपा आयुक्त, महापौर यांनी किमान वेतन देण्याचे आश्वासन दिले.
  6 महिने उलटुन सुद्धा आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने कामगारांनी 2 ऑगस्ट पासून बेमुदत संप आंदोलन सुरू केले आहे, जोपर्यंत किमान वेतन कायद्यानुसार देण्यात येणार नाही तोपर्यंत शहरात कुठेही कचरा संकलनाला जाणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.
  कोरोना काळात कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शहरातील प्रत्येक घरी जात कचरा संकलन केला मात्र त्यांच्या या कार्याची मनपाने कधी दखल घेतली नाही.

  कचरा संकलन करणाऱ्या कामगारांना किमान वेतन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असा ईशारा ही यावेळी आंदोलकांनी दिला.