• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  आमदार मनपा आमने सामने की भाजपा विरुद्ध आमदार

  धम्मशीलशेंडे

  चंद्रपुर – चंद्रपुर चे आमदार किशोर जोरगेवार उद्याला मनपाच्या महापौर यांच्या vip नम्बर वरुन आंदोलन “चार एक्का, दे धक्का” चा बिगुल वाजवून शहर भर बैनर- पोस्टर लावले तर मनपाने काही ठिकाणी ते काढण्याचे प्रयत्न ही केले परंतु आज चक्क आमदारांच्या विरोधात वीडियो तयार करुण “दोनशे यूनिट चे आश्वासन देणारे, स्वतःचे घर सुद्धा स्वच्छ न करू शकनारे, दुसऱ्यां वर बोट ठेवणारे, नकारात्मक, आव आनणारे, स्वत काहीही काम न करणारे… आमदार” असा एकाकी टोलाही बजावला.
  यात मनपाने स्वताच्या नसलेल्या अमृत योजनेचा डंका वाजवला, घंटा गाडी आणी कोरोना गेल्यावर तयार केलेल्या आसरा रुग्णालय, कोरोना काळात केलेल्या अंत्यविधि व वादग्रस्त असलेल्या आजाद गार्डन च्या ही उल्लेखा ने पाठ थोपटली आहे.
  याआधी आमदार यांनी एक कोटी 43 लक्ष पाणी समस्या सोळविन्याकरिता दिले व कोरोना काळात 1 करोड चा निधि देय केला परंतु मनपाने त्याला स्वीकृति केले नाही या विरोधात मनपात भजन आंदोलन ही करण्यात आले.
  हे आंदोलन व विरोध भाजपा विरुद्ध अपक्ष आमदार विरोधी आहे की मनपा विरुद्ध आमदार विरोधात आहे ?
  कारण मनपाने वीडियो तयार केला त्याला आयुक्त, उपायुक्त यांचीही सहमती आहे काय ? हे प्रोटोकॉल मध्ये मोडते काय ? याकडे जनता बघते आहे .

   आमदार साहेब उद्याला या विरोधात काय भूमिका घेतात हे पाहणे तेवढेच महत्वाचे