• Advertisement
  • Contact
More

    मुल तालुका शिवसेना व युवासेना कार्यकारणी जाहीर

    शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसंपर्क मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहे. शिवसैनिकांनी ही मोहीम यशस्वी करावी व गाव वार्ड कोरोनामुक्त करावा असे आवाहन मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांनी केले तसेच येत्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती तथा नगर परिषद निवडणुका चे लक्ष ठेऊन मुल तालुका शिवसेना व युवासेना कार्यकारणी घोषित करण्यात आली
    हिंदुहदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम मुंबई, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे तथा युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.निलेश बेलखेडे यांनी मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांच्या शिफारशीनुसार मुल तालुक्यातील पदाधिकारी यांना चंद्रपूर येथे एन.डी हाॅटेल येथे एका विशेष कार्यक्रमात नियुक्ती पत्र देण्यात आले.
    त्यामध्ये मुल शहर प्रमुख पदी राहुल रामदास महाजनवार, शहर समन्वयक अरविंद करपे,तालुका समन्वयक पदि सुशी सरपंच अनिल सोनुले , उपतालुका प्रमुख रवि शेरकी , उपतालुका प्रमुख पदि नांदगाव उपसरपंच सागर देऊरवार,उपतालुका प्रमुख सत्यनारायण अमरूदिवार तसेच युवा सेना तालुकाप्रमुख पदि संदिप सुरेश निकुरे, युवा सेना शहर प्रमुख पदि इंजि.निखिल भोयर, तालुका समन्वयक पदि विनोद काळबांधे, शहर सरचिटणीस शिन्नु कन्नुरवार सर्व नियुक्त्या थेट मातोश्री येथुन होऊन सामना वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या आहे या सर्व नवनियुक्त झालेल्या पदाधिकारी यांचे अभिनंदन मुल तालुका शिवसेना प्रमुख नितीन येरोजवार,माजी ता.प्र.सुनिल काळे , महेश चौधरी ,शंकर पाटेवार, प्रशांत इन्नमवार,बालु इन्नमवार, तेजस शेरकी, आशिष गुंडोजवार, राजुअन्ना कन्नुरवार, कपिल येलगेलवार यांनी केले आहे.