• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  मूल च्या पक्षीप्रेमी राहुलला विविध फाउंडेशन तर्फे चार पुरस्कार जाहीर

  राहुलच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक

  मूल ( अमित राऊत )
  पशुपक्ष्यांचे अस्तित्व कायम राहावे,उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पशुपक्षीना पाणी मिळावे, या उद्देशाने मूल शहरातील पक्षीप्रेमी राहुल सुरेश आगळे झाडांना घागरी बांधून पक्ष्यांची तृष्णा भागविण्याचा उपक्रम राबविला. हा उपक्रम राहुल 2010 पासून राबवित आहे.
  अशा पक्षीप्रेमी करिता राज्यातील विविध फौंडेशन तर्फे स्पर्धा आयोजित करून पक्षीप्रेमींना मनोबल वाढविण्याचे काम करीत असतात.
  यात राज्यातील वृक्षप्रेमी फाउंडेशन तर्फे प्रथम पुरस्कार, सत्कार्य फाउंडेशन द्वारा प्रथम पुरस्कार, स्पॅरोताई फाउंडेशन तर्फे द्वितीय पुरस्कार आणि अग्रणी पाणी फाउंडेशन तर्फे द्वितीय पुरस्कार असे चे चार पुरस्कार मुल येथील पक्षीप्रेमी राहू आगळे याला मिळाले आहे.
  विविध स्तरातून या चार स्पर्धा 2020- 2021 ला घेण्यात आल्या. या चारही स्पर्धेत राज्यतून आणि राज्याच्या बाहेरून स्पर्धक सहभागी झाले होते. दोन स्पर्धेत राज्यातून प्रथम तर दुसऱ्या दोन स्पर्धेत राज्यातून द्वितीय असे पुरस्कार राहुलला प्राप्त झाले आहे.
  या ध्येयवेड्या पक्षीप्रेमी राहुलचा सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे.