• Advertisement
  • Contact
More

    मुल मध्ये मुसळधार पाऊस, नागरिकांच्या घरात शिरले पाणी

    मूल (अमित राऊत )आज मूल शहरात बरेच दिवसांनी पावसाने हजेरी जोरदार लावल्याने रोड नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत. रोड नाल्या उंच झाल्याने आणि घरे खाली असल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणी रोड नाल्या बनविले नसल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. अश्याच परिस्थितीमुळे अनेक नागरिकांना नुकसान व त्रास सहन करावा लागत आहे. विहीरगाव परिसरात शामामुखर्जी वाचनालय ते बौद्ध विहार पर्यंतचा रोड बनविले नसल्याने संजय मेश्राम यांच्या घरात पाणी शिरले.मेश्राम हे मोल मजुरी करून आपला उदर निर्वाह करतात. अश्या परिस्थितीत मुसळधार पाऊसाने घरातील तांदूळ, गहू जगण्याचे साहित्य आणि इतर साहित्य संपूर्ण निस्ताबुज झाले. त्यामुळे आता आमची नुकसान भरपाई कोण करून देणार? असा प्रश्न संजय मेश्राम हे करीत आहेत. संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.