• Advertisement
 • Contact
More

  मूल येथे शहीद स्मारक लवकरच —नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर यांची ग्वाही. कारगील शहीदांना मूल येथे आदरांजली!

  मूल (प्रतिनिधी)

  मूल शहरात लवकरच शहीद स्मारक तयार करण्यांत येईल असे आश्वासन नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर यांनी दिले. त्या मुल तालुका छायाचित्रकार संघटना तसेच श्री साई मित्र परिवार यांचे संयुक्त विद्यमाने मा. सा. कन्नमवार सभागृह येथे २२ व्या कारगिल विजय दिन कार्यक्रमात बोलत होते.
  भारतीय सैन्यानी उत्तुंग पराक्रम करीत, कारगीलमध्ये विजय संपादन केला. या लढाईत मूल येथील युवा सैनिक अनिल येत्ते यांनीही प्राणाची शर्थ केली. या दिनांचे औचित्य साधीत मूल येथील माजी सैनिकांचा सत्कार आणि कारगील शहीदांना श्रध्दांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांचे अध्यक्षतेस्थानी नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर, जेष्ट पत्रकार विजय सिध्दावार, राईस मील असोसिएशनचे जीवन कोंतमवार, नगरसेवक विनोद कामडे, उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. पुजा महेशकर, मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे, माजी जि. प. सदस्या मंगला आत्राम, साई मित्र परिवारचे अध्यक्ष अभिजीत चेपूरवार, माजी सैनिक बाबा सुर, फुलचंद मेश्राम उपस्थित होते.
  यावेळी बोलतांना, मुख्याधिकारी मेश्राम यांनी, कोरोणाचे विरोधातील लढाई देखिल कारगील प्रमाणेच असून, ही लढाई देखिल तेवढ्याच ताकदिने लढावे असे आवाहन केले. सैनिक सिमेवर भारतीय जवान म्हणून लढतो, मात्र गावात आल्यानंतर, तो विशिष्ट जातीचा, विशिष्ट धर्माचा होतो, ही बाब अशोभनीय असल्यांचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
  या कार्यक्रमाचे निमीत्ताने, विदर्भातील नामवंत चित्रकार भारत सलाम यांनी कार्यक्रम सुरू असतांनाच कारगील युध्दाची पेंटिंग तयार केली व ती प्रशासनाला भेट दिली. कलानिकेतनच्या चमुने, देशभक्तीपर गित सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित राऊत, संचालन सुजाता बरडे तर आभार प्रदर्शन वासू वाकडे यांनी केले.
  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
  विवेक मुत्यलवार, सचिन वाकडे, रूपेश कोठारे, बंडू साखलवार, संदिप मोहबे, नितीन अलगुनवार, पिंटू पिपंळे, रितीक पोगुलवार, रोहीत अडगुरवार, महेश भुरसे, प्रविण गभणे श्रीसाई मित्र परिवार सदस्य, मूल तालुका छायाचित्रकार संघटना आदिनी मेहनत घेतली.