• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    दगडाने ठेचून युवकाची हत्या। वरोरा तालुक्यातील सालोरी येथील थरार

    वरोरा :- तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सालोरी गावातील एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही थरारक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. शेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून युवकाचे प्रेत ताब्यात घेतले. मृतकाचे नाव अमोल रामदास दडमल (३३) रा. सालोरी असे आहे.
    अमोलचा मृतदेह घरापासून काही अंतरावर गावातच आढळून आला. त्याच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचल्याच्या खुणा दिसून आल्या. शेजारी रक्ताने माखलेला दगड होता. यावरून दगडाने ठेचून त्या युवकाची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
    हत्या झाल्यानंतरही घरच्यांनी पोलिसांना कळविले नाही. यामुळे अनेक शंका व्यक्त केल्या जात आहे. युवकाचा मृतदेह गावात असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मारेकऱ्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आले नाही. काही वर्षापूर्वी सालोरी गावाच्या शिवारात एका इसमाची हत्या करण्यात आली होती, परंतु त्याच्याही मारेकऱ्याचा शोध अद्याप लागला नाही, अशी चर्चा परिसरात केली जात आहे. घटनेचा तपास शेगाव पोलीस करीत आहेत.