• Advertisement
  • Contact
More

    जुन्या वादातून मित्रांनीच केली मित्राची हत्या

    चंद्रपूर शहरातील म्हाडा कॉलनीच्या निर्जन भागात युवकाची हत्या झाल्याची घटना शनिवारी उजेडात आली. तिरवंजा गावी राहणाऱ्या संकेत सुमटकर याची 2 मित्रांनी जुन्या वादातून हत्या केल्याचे तपासात उघड झाले. शुभम साखरकर आणि संगम सागोरे या दोघांनी ही हत्या केल्याचे प्राथमिक निष्पन्न पोलीस तपासात झाले आहे. आरोपीनी स्वतः पोलिसांना फोन करून या हत्येची माहिती दिली. या तिन मित्रांनी दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी मद्यप्राशन केले. आरोपीनी रात्री देखील मयताला निर्जन जागी नेत दारू  पाजली. त्याचवेळी जुना वाद उकरून काढत वाद केला आणि चाकूने वार करत संकेतची हत्या केली.  पोलिसांनी या हत्येचा उलगडा करण्यासाठी अधिक तपास सुरू केला आहे.