• Advertisement
 • Contact
More

  बल्लारपूर-सास्ती मार्गावर एका अज्ञात इसमाची धारदार शस्त्राने हत्या

  बल्लारपूर पुन्हा हादरले

  चंद्रपुर :- बल्लारपूर शहरात गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्याचे नावच नाही, दिवसेंदिवस गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे?
  नुकतीच काही दिवसांपूर्वी वराह पकडण्याच्या क्षुल्लक कारणावरून डॉ. आंबेडकर वार्ड परिसरात एकाची हत्या झाली होती तर अवघ्या काही दिवसांपूर्वी महाराणा प्रताप वॉर्ड परिसरात 4 ते 5 व्यक्तींनी एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता सुदैवाने बल्लारपूर पोलीस दाखल झाल्याने व वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्या तरुणाचे प्राण वाचले मात्र शहरात पुन्हा भाईगिरीचे प्रस्थ वाढत चालले की काय?

  विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार आज सायंकाळी 5:00 वाजताच्या सुमारास बल्लारपूर-सास्ती मार्गावर एका अज्ञात व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली असल्याचे वृत्त आहे तसेच मृतकाच्या शरीरावर धारदार शस्त्रांचे घाव असल्याची सूत्रांची माहिती आहे. मृतकाची ओळख अद्याप पटली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.