• Advertisement
  • Contact
More

    नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या : आमदार सुभाष धोटे

    राजुरा (ता.प्र) :– नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे अनेकांनी घरे शतीग्रस्त झाली जनावरे वाहून गेलीत वीज पडून अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. गेली दोन वर्षापासुन अनेक शेतकरी व नागरिक आर्थिक मोबदल्यापासून वंचित आहेत. हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगात असतांना अनेकांना आर्थिक मोबदला न मिळाल्याने गोरगरीब कुटुंब अडचणीत सापडले आहेत अशा नागरीकांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी मदत व पुनर्वसन आपत्ती पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे केली आहे.
    राजुरा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात अतिवृष्ठी व विज पडुन अनेकांची घरे कोसळली तसेच शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहे. पंरतु संबंधित कुंटुंबाना व शेतकऱ्यांना गेली २ वर्षापासुन अजुनही मोबदला मिळाला नाही. शेतकरी कष्टकरी वर्ग आधीच अतिवृष्ठी, सततची नापिकी, कर्जबाजारीपना इत्यादी कारणामुळे हवालदिल झोलेले आहेत. काही गावांमध्ये विज पडुन घरे जळाले तर अनेक गावात अतिवृष्टीने घरे कोसळली आहेत. एवढेच नाहीतर विजेमुळे शेतकरी व शेतकऱ्यांचे औताचे बैल मृत पावल्याने ऐन हंगामाचे दिवसात शेतकऱ्यांच्या कुटुंबांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
    तसेच आज दिनांक २२ जुलै २०२१ रोजी राजुरा तालुक्यात झालेल्या अतिपावसात अनेकांच्या घरात पावसाचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात काहीठिकाणी जिवितहानी झाली याची तातडीने पंचनामे करून नुकसान आर्थिक मोबदला देण्याबाबत तहसीलदार यांना सुचना देण्यात आल्या.