• Advertisement
 • Contact
More

  नकोडा-मुंगोली पुल जिर्ण अवस्थेत

    24 तास वेकोली खदानीची जडवाहतूक सुरु वेकोली खाणीचा पैनगंगा, मुंगोली, कोलगाव, इत्यादी खदानीच्या कोळसा ओल्ड साईडिंग, न्यू साईडिंग, जडवाहतूक ३५ टन, ४०टन, २० टन, असे कोळसाची वाहतूक वर्धा नदीच्या पुलावरुन सुरु असून मात्र वेकोलीच्या आधिण या पुलाची निर्माण करण्याची जवाबदारी असून, वेकोलीचे दुर्लक्ष होत आहे. इबादूल सिद्दिकी समाजिक कार्यकर्ता यांनी २/०९/२०२१ ला निवेदन देऊन मागणी केली. सि.एम.डी. वेकोली नागपुर, मुख्य महाप्रबंधक तळाली, PWD राष्ट्रीय महामार्ग, पाठपुरावा करण्यात येत आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्या दुचाकी स्वारास खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे, वेकोलीचेही कर्मचाऱ्यांनापण खूप मोठा त्रास अपघाताला बळी पडावे लागत आहे. अनेक वेळा या पुलाखाली जडवाहतूकीचे ट्रक पुला खाली पडले आहे. 
   
    या मार्गावर साखरा, कैलाश नगर, मुगोली, शिंदोला, येणाळी, कोलगाव, येनक, येणाळी, शिवणी असे अनेक गावाचा मार्ग असून नागरिकांना आपला जिव मुठ्ठीवर घेऊन चालावा लागत आहे. गावनागरिकांची मागणी व सामाजिक कार्यकर्ता इबादूल सिद्दिकी यांची मागणी अनेक महिण्यापासून आहें. पुलाची दुरुस्ती व मार्गाचा रोड तसेच जळवाहतूकीवर नियंत्रण वेग करण्यात यावी अशी मागणी नागरिकातर्फे केल्या जात आहे,
  
  
  नौशाद शेख, घुग्घुस, प्रतिनिधि-सर्च टि.व्ही.