• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  हंसराज अहीर यांच्या यशस्वी मध्यस्थीने नारंडा सिमेंटमधील पूर्व कामगारांच्या मागण्या मान्य

  उर्वरीत मागण्या लवकरच मार्गी – खुषाल बोंडे*

  चंद्रपूर – नारंडा सिमेंट उद्योगातील पुर्वीच्या कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी नारंडा सिमेंट कामगार संघाव्दारे दालमिया व्यवस्थापनाबरोबर सातत्याने संघर्शषील प्रयत्न केल्याने अखेर या कामगारांना न्याय मिळुन त्यांचे अनेक प्रष्न मार्गी लागले असल्याने संघटनेव्दारा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व उद्योग व्यवस्थापनाचे विषेश आभार मानले आहे.
  या प्रकरणात पूर्व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे सतत मार्गदर्षन लाभल्याने कामगारांचा प्रलंबित प्रष्न निकाली निघाल्याचे सिमेंट कामगार संघाचे अध्यक्ष खुषाल बोंडे यांनी मान्य करीत संघटनेने कामगार हिताचा हा लढा जिंकल्याबद्दल समाधान व्यक्त करीत उर्वरीत प्रष्नांबाबत व्यवस्थापनासोबत चर्चा सुरू असून ते प्रष्नही लवकरच मार्गी लागतील असा विष्वास व्यक्त केला.
  कामगार संघटना व सिमेंट व्यवस्थापनासोबत अनेक प्रष्नांची सोडवणूक झाली असून त्यात मुख्यत्वे पुर्वीच्या मुरली सिमेंट मधील 306 कामगारांना पूर्ववत कामावर सामावून घेण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे. सुमारे 85 कामगारांना उद्योगात नियुक्त करण्यात आले असून 45 कामगारांचे नियुक्तीपत्र तयार आहेत. पाॅवर प्लाॅंट मधील 24 कामगारांना याच प्लाॅंट मध्ये घेण्यास व्यवस्थापनाने मान्य केले आहे. 36 कामगारांना अपात्रतेमुळे वगळण्यात आले होते आता त्यांनाही नियुक्त करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाव्दारे सांगण्यात आले. 50 वर्शाहुन अधिक वय असलेल्या कामगारांनासुध्दा सामावून घेवू असेही कंपनीने मान्य केले आहे. याबरोबरच सीटीसी अंतर्गत 24 टक्के पीएफ ची रक्कम कपात करण्यात येत होती, चर्चेनंतर 12 टक्के पीएफ रक्कम आगाऊ वेतनात वाढविण्यात आली आहे. फीटर, वेल्डर व आॅपरेटर यांना सेमीस्कील्ड (अर्धकुषल) मधुन स्कील्ड (कुषल) कामगार म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

  नियुक्ती पत्रातील चैथ्या क्रमांकाचा मुद्दाही व्यवस्थापनाने निकाली काढला आहे.
  स्टाॅफ कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येत असून त्यांनाही लवकरच नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. पॅकींग प्लाॅंट मधे 12 कामगारांना नियुक्त करण्यात आले असून उर्वरीत कामगारांना लवकरच कामावर घेण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले. या संबंधात कामगारांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष खुषाल बोंडे, कार्याध्यक्ष वासुदेव बेसुरवार, उपाध्यक्ष साईनाथ सोनटक्के, सचिव दिपक भोस्कर, सहसचिव सुनिल जिवने, कोशाध्यक्ष नथ्थु बोबडे यांनी तर व्यवस्थापनाच्या वतीने श्री भुसारी साहेब, उमेष कोल्हटकर, पराग पामपट्टीवार यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. या उपलब्धीमुळे कामगारांमध्ये आनंद व्यक्त होत असून त्यांनी संघटना पदाधिकारी व विषेशतः हंसराज अहीर यांचे आभार मानले आहे.