• Advertisement
  • Contact
More

    नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश ०८ लाख रू. ईनामी असलेल्या ०२ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

    गडचिरोली :- शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला
    खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याच बरोबर आत्मसर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतेच ८ लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी नामे विनोद ऊर्फ मनिराम नरसु बोगा वय ३२ वर्ष रा. बोटेझरी, पोमके गॅरापत्ती ता. कोरची जि. गडचिरोली व कविता ऊर्फ सत्तो हरीसिंग कोवाची वय ३३ वर्ष रा. गौडपाल ता मानपूर जि.राजनांदगाव (छ.ग.) यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांच्या समोर आत्मसमर्पण केले.
    विनोद बोगा व कविता कोवाची हे दोघे पती-पत्नी असून विनोद बोगा हा कोरची दलममध्ये एसीएम पदावर दलम डॉक्टर म्हणुन कार्यरत होता व त्याची पत्नी कविता कोवाची ही पार्टी मेंबर या पदावर
    टिपागड दलममध्ये कार्यरत होती. विनोद बोगा यांचेवर खूनाचे १३, चकमकीचे २१ , जाळपोळ ०१ व इतर ०५ असे गुन्हे दाखल असुन पत्नी कविता हीचेवर चकमकीचे ०५, जाळपोळ ०१ व इतर ०३ असे
    गुन्हे दाखल असून शासनाने विनोद बोगा याचेवर ०६ लाख रूपयाचे तर कविता कोवाची हिचेवर ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
    गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २०१९ ते २०२१ सालामध्ये एकुण ४३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये ४ डिव्हीसी, ०२ दलम
    कमांडर, ०३ उपकमांडर, ३३ सदस्य व ०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. सदर दोन्ही नक्षलींचे आत्मसमर्पण घडवुन मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई गडचिरोली जिल्हयाचे पोलीस अधीक्षक मा.श्री. अंकित गोयल सो यांचे मार्गदर्शनाखाली धानोराचे उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री.स्वप्निल जाधव यांनी
    पार पाडुन मोठी भुमिका बजावली आहे. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर ०२ जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षली हालचालींवर अंकुश ठेवण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश प्राप्त झाले आहे.
    आतापर्यंत एकुण ६४७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेले असून गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातुन एकुण १२७ आत्मसमर्पत नक्षल सदस्यांना भुखंड वाटप, १०७ आत्मसमीत नक्षल सदस्यांना
    घरकुल वाटप, ६४३ आत्मसमपीत नक्षल सदस्यांना आधारकार्ड वाटप, ३६ महिला आत्मसमीत नक्षल सदस्यांना शिलाई मशिनचे वाटप, २३ आत्मसमपीत नक्षल सदस्यांना शेळी पालन व इतर अनेक शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. त्यामुळे आत्मसमीत नक्षलवाद्यांचे प्रमाण वाढत असून ते लोकशाहीच्या मुख्यप्रवाहात सामिल होवुन सन्मानाने जीवन जगत आहेत.
    विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना
    विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. अंकित गोयल यांनी केले आहे.