• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ अध्यक्षा वैशाली माढे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

    चंद्रपुर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ अध्यक्षा वैशालीताई माढे ह्यांच्या प्रमुख उपस्तीतीमध्ये संबधित विभागाची बैठक चंद्रपूर येथील विश्रामगृह येथे घेण्यात आली ह्यावेळी संबंधित विभागात कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या आणि समश्या ऐकून त्यावर वैशालीताई माढे यांनी मार्गदर्शन केले.

    बैठकी दरम्यान शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी वैद्य, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे, माजी विभागिय अध्यक्ष संजय वैद्य, शहर महासचिव धनंजय दानव, कला संस्कृतीक विभागाच्या शहर अध्यक्षा ज्योती रामाराव तसेच ग्रामीण अध्यक्ष डॉ शाम माहुरकर इतर जिल्हा व शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.