• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  चंद्रपुर.. ‘तुला मनपा वर भरोसा नाही काय’ राष्ट्रवादी युवती काँग्रेस चे खडया विरोधात अनोखे आंदोलन

  अपघातग्रस्त पूजाला मदतीचे आवाहन

  चंद्रपुर :- शहरातील मूख्य मार्ग असलेल्या अंचलेश्वर गेट ते बागला चौक ते बाबुपेठ मार्ग हा पूर्णतः खड्यात असलेला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत, यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घेऊन वाहन चालवावे लागते, बरेच जण या रस्त्यावर पडून अपघातग्रस्त झाले आहेत.
  अशीच एक युवती पूजा घोंगरे ही महाकाली मंदिरा समोरिल याच खड्यात पडून अपघात ग्रस्त झाली ति मागील दोन महिन्यांपासून कोमात होती, आत्ताही ती चालू शकत नाही.
  असे अनेक अपघात या मार्गावर दिवसेंदिवस होत असतात या विरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेस चंद्रपुर ने आज रसत्यावरिल खड्यात बेशरमाची झाडे लावत पथनाटयातुन महानगर पालिके विरुद्ध आपला आक्रोश व्यक्त केला.
  हे आंदोलन आंबेडकर चौक बाबुपेठ येथून सुरु करण्यात आले त्यानंतर समता चौक, बागला चौक, महाकाली मंदिर पासून महानगर पालिके समोर मनपा विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
  मनपाने लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे बुजविले नाही तर मनपा विरोधात तिव्र आंदोलन करू असा ईशारा राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या शहर अध्यक्षा प्रज्ञा पाटिल यांनी यावेळी दिला तसेच अपघात ग्रस्त पूजाला शासनाने आर्थिक मदत करावी अशीही मागणी करण्यात आली.
  सदर आंदोलन प्रज्ञा प्रदीप पाटील राका महिला शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात, मनीषा सपट शहर उपाध्यक्ष, बेबीताई उइके जिल्हाध्यक्ष, मंगलाताई आखरे, हीराचंद बोरकुटे, डी के आरिकर, विनोद लभाने, विपुल लभाने, संपदा चालखुरे शहर उपाध्यक्ष, सोनाली वागसुरे शहर महासचिव, प्रांजली वासनिक, कविता तेलंग प्रभाग अध्यक्ष, राणी येलेकर, निराशा खोब्रागडे, प्रतीक्षा सहारे, नम्रता रायपुरे, प्रीती लभाने, दिशांनी लभाने, वैशाली साखरे आदिंच्या उपस्थितित करण्यात आले.