• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  नविन सीईओ मिताली सेठी यांची दुर्गम भागातील शाळेला भेट

  जिवती :- मित्ताली सेठी नुकत्याच चंद्रपुर जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यपालन अधिकारी पदावर रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी ग्रामविकासावर जास्त भर देणार असेही वर्तविले होते.
  मंगळवारी जिवती येथे पंचायत समितीच्या सभागृहात सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. एक ते दोन तासांच्या आढावा बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुक्यातील ३६५ दिवस चालणाऱ्या जि.प. प्राथमिक शाळा पालडोह शाळेला विशेष भेट दिली.

  या भेटीत त्यांनी शाळेची पाहणी केली आणि इयता आठवीच्या विद्यार्थ्यांशी हितगुज केली. या अतिशय दुर्गम, नक्षलबहुल आदिवासी भागात ही शाळा आठ वर्षांपासून ३६५ दिवस चालते आहे याचे त्यांना कौतुक वाटले.

  या शाळेतील विद्यार्थी कमी व शिक्षक जास्त वाटत आहेत, असेही त्या मिस्किलपणे म्हणाल्या. इतर शाळांनी सुध्दा याची प्रेरणा घेणे गरजेचे आहे, असेही सीईओ सेठी यांनी यावेळी बोलून दाखविले. या शाळेसाठी काही मदत लागल्यास आम्ही सदैव तत्पर असणार असे म्हणत मुख्याध्यापकांचे कौतुक केले.