• Advertisement
  • Contact
More

    बल्लारपुरातून 19 गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव

    चंद्रपुर :- बल्लारपूर शहरात अलीकडे गुन्हेगारी वाढली असून गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांचा वावर वाढत आहे. यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु, बल्लारपूर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र असून कोळसा चोरी व्यवसाय व अवैध दारु, रेती तस्करीच्या प्रभाव यामुळे शहरामधील वातावरण अधिक मलिन न व्हावे, यासाठी बल्लारपुर पोलिस निरीक्षक पाटील यांनी 19 गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे.
    सन 2020 मध्ये 10 गुन्हेगार तडीपार होते. तर यावर्षी सूरज बहुरिया हत्याकांडातील बच्ची गॅंगचे सहा गुन्हेगार व इतर दोन असे आठ गुन्हेगार तडीपार आहेत.