• Advertisement
 • Contact
More

  निराधार दिलीपचे अंधारमय जीवन

  दोन्ही डोळ्यांनी अंध असून करतो स्वयंपाक; दिलीप झुंगरे यांना मदतीची गरज

  राजुरा : डोळ्याविना जीवन व्यर्थ असे म्हणल्या जातात मात्र राजुरा तालुक्यातील साखरी (वा) या गावचा दिलीप झुंगरे (वय ३०) मागील सोळा वर्षांपासून दोन्ही डोळ्यांनी आंधळा असून स्वतःचे काम स्वतः करीत सकाळ सायंकाळ स्वयंपाक करून जीवन जगत आहे. मात्र आई वडिलांच्या निधनानंतर त्याचा आधार गेल्याने बारावर्षापासून निराधार झालेला दिलीप अंधारमय जीवन जगत असून त्याला मदतीची गरज आहे.

  बारावी वर्ग शिक्षण घेतलेल्या दिलीप चा जन्मताच एक डोळा अंध होता, अकरावीचे शिक्षण झाल्यानंतर दुसरा डोळा निकामी झाला. मदतनिस घेऊन बारावीचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर डोळ्यावर उपचार करण्याकरिता २००७ साली हैद्राबाद गाठले मात्र डॉक्टरांनी दोन्ही डोळे कायमचे निकामी झाले असल्याचे सांगितल्याने दिलीपचे जीवन अंधारमय झाले. २०११ साली आई वडिलांचे छत्र
  हरवपल्याने दिलीप एकाकी पडला, दिलीपचा मोठा भाऊ आहे परंतु तोही एका डोळ्यांनी अंध असून नेहमी नशेत राहत असल्याने बहुतांश तो घराबाहेर राहत असल्याने दिलीप ला एकाकी अंधारमय जीवन जगावे लागते आहे.

  आई-वडिलांचा आधार गेला तेव्हापासून दिलीप टिनपत्रे टाकलेल्या चार खोलीच्या घरात स्वतःच स्वयंपाक करीत असून स्वतःचे काम स्वतः सरीत आहे.

  भूमीहीन असल्याने त्यांच्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी कोणताच पर्याय नसल्याने गावातील मित्रमंडळी गरज भासल्यास तुटपुंजी मदत करीत असते मात्र तुटपुंज्या मदतीवर संपूर्ण आयुष्य काढणे शक्य नसल्याने संपूर्ण आयुष्यभर दिलीप ला कायम स्वरुपी मदतीची गरज आहे.