• Advertisement
  • Contact
More

    पत्नीची हत्या करून सुनेचा पण गळा दाबणाऱ्या आरोपीचे समर्पण

    बल्लारपूर :- बीटीएस प्लाट शिवाजी वार्डातील रहिवाशी काजल डे, जे की व्यवसायांनी आटो चालक व चायनीज हाटेल चालवतो, त्याची पत्नी आशा डे वय 45 वर्ष मागील काही वर्षा पासून कॅन्सर ने पीडित असून सून प्रियांका डे वय 29 वर्ष या दोघांना आरोपी काजल डे यांनी 14 जुलै चा संध्याकाळी 6 वाजता चा दरम्यान गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला त्यात आशा डे पत्नीची आरोपी काजल ने गळा दाबून हत्या केली व सूनेचा गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला, वेळेवर दवाखान्यात भरती केल्यामुळे सुन बचावली.

    आरोपी काजल याने पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले व गुन्हा घडल्याचे सांगितले, त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार पाटील यांचा मार्गदर्शनात सुरू आहे.

    काजल ने हत्यासारखा गुन्हा घडवून आणला याचा स्थानिक नागरिकांना विश्वासच बसत नाही आहे, घरगुती वादाचे आतील कारण काय आहे ते पुढे येईलच हे विशेष.