सावली(सूरज बोम्मावार)
सावली तालुक्यातील व्याहड खुर्द येथील विनोद शेंडे यांच्या घरा जवळील परिसरात रात्रौ च्या सुमारास एक विषारी साप असल्याची माहिती येथील टायगर वन्य जीव रक्षक संस्था सावली च्या व्याहड खुर्द येथील सर्प मित्र नितीन पाल, चिंतामण तरारे, श्रीकांत यंपालवार, मयूर यांना देण्यात आली त्यांनी या जहाल विषारी सापाला पकडत असताना पटेरी मणियार हे साप असल्याचे दिसले. सर्पमित्रांनी अत्यंत हुशारीने या सापाला पकडले व वनपाल यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर टायगर वन्य जीव रक्षक संस्था सावली चे अध्यक्ष विवेक लेनगुरे, प्रकाश शेंडे यांनी त्या सापाची नोंद करण्यासाठी सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले आहे. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी, वनपाल कोडापे यांनी नोंद घेत त्या सापाला सावली वनपरिक्षेत्रामध्ये सोडण्यात आले.
