• Advertisement
  • Contact
More

    पथनाट्याद्वारे डेंगू तथा मलेरिया बाबत जनजागृती

    भद्रावती येथील गुरुदेव सेवा मंडळाचा उपक्रमभद्रावती : भद्रावती शहरात डेंग्यू तथा मलेरियाचा प्रकोप वाढला आहे. त्यासाठी पालिकेने प्रत्येक प्रभागात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. पालिकेच्या या उपक्रमाला साथ देण्यासाठी शहरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेले गुरुदेव सेवा मंडळही आता मैदानात उतरले असून, गुरुदेव सेवा मंडळातर्फे पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांत डेंग्यू व मलेरिया निर्मूलनासाठी कराव्या लागणाऱ्या बाबींबद्दल जनजागृती करणे सुरू करण्यात आले आहे. त्यात परिसर स्वच्छतेचा मंत्र देखील देण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागात गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते पथनाट्य सादर करून नागरिकांत जनजागृती निर्माण करीत आहे. हे पथनाट्य पाहण्यासाठी प्रभागातील नागरिक आता गर्दी करू लागले असून यातून जनजागृतीचे उद्दिष्ट नक्की साध्य होईल असा विश्वास गुणवंत कुत्तरमारे, विशाल गावंडे यांनी व्यक्त केला आहे. या जनजागृतीपर पथनाट्य पथकात गुणवंत कुत्तरमारे, विशाल गावंडे, विवेक महाकाळकर, गजानन डंभारे, प्रकाश पिंपळकर, रवि लांडगे, बालाजी ताडे, सुवर्णा पिंपळकर, सोनाली गावंडे, शुभांगी कुत्तरमारे, ऋषिकेश मेश्राम, आदित्य पिंपळकर, किरण रणदिवे तथा गुरुदेव सेवा मंडळाच्या अन्य कार्यकर्त्यांचाही सहभाग आहे