• Advertisement
  • Contact
More

    पावसाचे पाणी घरात,वार्डवासीय त्रस्त, तहसीलदारांची रात्रौ घटनास्थळी भेट

    मुल :— रस्ते आणि नाल्या उंच झाल्याने पावसाचे पाणी घरात शिरले.गुडघाभर पाणी घरात जमा झाल्याने वार्डवासीय जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला.हा फटका मुल मधील वार्ड क्र.9 आणि 10 मधील जनतेला रविवारी रात्री बसला. स्थानिक मुल मध्ये रविवारी रात्री  मुसळधार पाउस कोसळला.सरीवर सरी पडल्याने रस्त्यावरचे पाणी नाली मध्ये न जाता लोकांच्या घरात जमा झाले.मुल मध्ये विकास कामा अंतर्गत वार्डावार्डात सिंमेटं रस्ते आणि नाल्या बनविण्यात आले आहे.सदर कामे करत असताना स्थानिक नागरिकांच्या राहणीमानाचा विचार न करता उंच बनविण्यात आले आहे.नाली बांधकाम करताना सुदधा सिमंेट पाईपने नाल्या तयार करण्यात आल्या आहेत.त्यामुळे पावसाचे पाणी वाहुन जाण्यास मोठी अडचण  निर्माण  होते आहे.तोच फटका रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांना बसला.मेघ गजर्नसह बरसलेल्या मुसळधार पावसाचे पाणी वाहुन जाण्यास सिमेंट नाली ची मोठी अडचण निर्माण झाल्याने पावसाचे पाणाी लोकांच्या घरात जमा झाले.वार्ड क्रं.9 आणि 10 येथील सुभाष नगरातील रहिवास्यांना मोठा फटका बसला. घरातील संपुर्ण खोल्या पावसाच्या पाण्याने वेढल्या गेल्या.फटका बसलेल्या लोकांना आपल्या घरातील सामान उंच ठिकाणी ठेवावे लागले.घरातील पाणी काढता काढता ब—याच लोकांच्या नाकीनउ आले. पावसाचे पाणी घरात शिरल्याने वार्डात एकच हाहाकार माजला.घटना माहित होताच मुलचे तहसिलदार डा.रविंद्र होळी यांनी रात्रीच घटनास्थळाची पाहणी केली.