• Advertisement
 • Contact
More

  शहरात पेट्रोल चोरीचे प्रकरण बढावले सीसीटीवी कॅमेरा त चोर कैद

  चंद्रपुर :- जिल्ह्यातील दारुबंदी हटली परंतु शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले नाही तर गुन्हेगारांनी गुन्हेगारीचे वेगवेगळे रस्ते शोधणे सुरु केले.
  असाच एक प्रकार तुकुम परिसरातील एस टी वर्क शॉप जवळील घोडा चौकात राहणारे दिलीप रागीट यांच्येकडे घडला, मागील 15-20 दिवसांपासून त्यांच्या परिसरातील दुचाकी वाहनांचे रोज सकाळी पेट्रोल टंकी रिकाम्या दिसायच्या, गाडी खराब असेल किव्हा काही इतर घडले असेल अश्या मानसिकतेत 4-8 दिवस गेले परंतु हा प्रकार सुरुच राहिला.
  एक दिवस रागीट व त्यांचे भाडेकरू वेणु हंटम यांनी वाहनांच्या दिशेने सीसीटीवी कॅमेरा लावला व सकाळी कॅमेरा बघितला असता सर्व चित्र स्पष्ट झाले.
  एक युवक वाहनांतील पेट्रोल चोरी करतांना सीसीटीवी कॅमेरात कैद झाला.
  पेट्रोल चोरी करणारा अट्टल चोर आहे कि खोळकर मूल हे बघणेही तितकेच महत्वाचे !
  असे प्रकार नेहमी या परिसरात घडत असतात या प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.