• Advertisement
 • Contact
More

  पोळा व तान्हा पोळा सणानिमित्त जिल्हा प्रशासनाचे निर्देश जारी

  चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने पोळा व तान्हा पोळा सणानिमित्त निर्देश जारी केले आहे. कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे.
  तसेच गर्दी, जमाव टाळण्यासाठी धार्मिक कार्यक्रमावरील निर्बंध कायम ठेवण्याबाबत आदेशीत केलेले आहे. त्यामुळे शासन निर्देशानुसार सद्यस्थितीत पोळा व तान्हा पोळा सण मोठया प्रमाणात साजरा करता येणार नाही. सदर सण उत्सव घरच्या घरी साधेपणाने साजरा करता येईल.
  .
  नौशाद शेख घुग्घुस: प्रतिनिधि सर्च टि, व्ही,