• Advertisement
 • Contact
More

  पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे रक्तदानाचा महायज्ञ शिबिरला 123 युवा वर्गाचा उस्फूर्त प्रतिसाद

  (प्रशांत गेडाम)

  सिंदेवाही – आज दिनांक 03/09/2021 रोजी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे मा. अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा.अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व मा. मिलिंद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी, यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येणारी शांतता कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती, सार्वजनिक गणेश मंडळ, व्यापारी असोसिएशन समिती सिंदेवाही, पत्रकार बंधु, व शहरातील युवावर्ग यांच्या सहकार्याने चंद्रपूर जिल्ह्यातील रक्त पेढीमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने गणेश उत्सव साजरा न करता सामाजिक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे रक्तदानाचा महायज्ञ शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला . त्यामध्ये तालुक्यातील युवा वर्गाने उस्फूर्त प्रतिसाद देऊन एकूण 123 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.
  तसेच सदर रक्तदानाचा महायज्ञ शिबिराला मिलिंद शिंदे उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मपुरी, गणेश जगदाळे तहसीलदार सिंदेवाही, अरुण गौड वनपरिक्षेत्र अधिकारी, अमोल बनसुरे व शशिकांत पेंढारकर तालुका कृषी अधिकारी, रमाकांत लोधे जि प सदस्य, नागराज गेडाम सभापती समाज कल्याण जि. प. चंद्रपूर, राहुल पोरेड्डीवार प.समिती सदस्य, तसेच आशाताई गंडाटे अध्यक्ष नगरपंचायत , उपाध्यक्ष कावळे नगरपंचायत, सिंदेवाही तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बंधू व भगिनी यांनी रक्तदात्यांचा उत्साह वाढवण्याकरिता रक्तदानाच्या महायज्ञ शिबिराला भेट दिली.
  तसेच सिंदेवाही स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार रक्तपेढी चंद्रपूर व ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथील वैद्यकीय पथक यांनी रक्तदानाचा महायज्ञ शिबिर यशस्वी होण्याकरिता यातोचीत्त परिश्रम घेतले.