• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    राजकीय भूकंप ओबीसी महासंघाचे अशोक जीवतोडे यांनी बांधली राष्टवादी ची घड्याळ

    ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक, विदर्भवादी नेतृत्त्व डॉ. अशोक जीवतोडे यांनी अचानकपणे मुंबई स्थित यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला.
    हाताला घड्याळ बांधून त्यांनी आता सक्रिय राजकारणात प्रवेश केल्याचे संकेत दिले आहे. बुधवार, 14 जुलैला दुपारी 1 वाजता झालेल्या डॉ. अशोक जीवतोडे यांच्या राष्ट्रवादी काँगे्स पक्षात प्रवेश प्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. शरद पवार यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात घालून डॉ. जीवतोडे यांचे स्वागत केेले.