• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    खाजगी प्राथमिक शिक्षक संघातर्फे (माध्य) शिक्षणाधिकारी यांना निवेदन मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

    चंद्रपूर : खाजगी प्राथमिक शिक्षक संघातर्फे (माध्य) शिक्षणाधिकारी यांना विविध मागण्या संदर्भात शासनाकडून अद्यापही कुठलीही ठोस कार्यवाही न केल्यामुळे कोरोनाने व इतर आजाराने मृत पावलेल्या कुटुंबातील व्यक्ती सह संघटना पदाधिकारी यांच्या समवेत आज जि.प.चंद्रपूर येथील माध्यमिक शिक्षणअधिकारी प्रा.नरड यांना निवेदन दिले आहे. शिक्षणाधिकारी (प्राथ व माध्य) यांनी शाळा अनुकंपा तत्वावरील कुटुंबाची माहिती व प्रत्यक्ष संस्था सचिव/ मुख्याध्यापक यांना पत्र देणे आवश्यक आहे. अनुकंपा तत्वावर नियुत्तäयाबाबत उच्च न्यायालय यांचे निर्देश आणि संस्थेने ठराव पाठविलेला नाही असे संबोधन आपली जबाबदारी झटकत आहे. ठराविक रक्कम देणा-यांची किंवा वशिला लावणा-यांची कामे होतांना दिसून येत आहे. इतरांना केराची टोपली असा प्रकार आहे. सानुग्रह अनुदान ५० लक्ष याबाबत आदेश नाही. खाजगी प्राथमिक शिक्षक संघाच्या १६ जून २०२१ च्या निवेदनावर कार्यवाही नाही. तसेच दि. ०५.जुलै २०२१ ला मा. शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग नागपूर व दि. ०६.जुलै २०२१ ला मा. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, तुमसर येथे मृत पावलेल्या शिक्षक व कर्मचा-यांच्या परिवारासह धरणे आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना महामारीत कोरोनाने व इतर आजाराने मृत पावलेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संख्या जवळपास १६ कुटूंबे आहे. सदर आंदोलनातील मुद्यांवर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास व मृत कर्मचा-यांच्या परिवारातील सदस्यांना अनुकंपा तत्वावर नौकरी व सानुग्रह अनुदान ५० लक्ष आदीसह मागण्या मजूर न केल्यास न दिल्यास नजीकच्या काळात मृत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा कुटुंबासह खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी / प्रतिनिधी निषेध म्हणून उर्वरित सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे/ निदर्शने स्वरूपाचे आंदोलन घेण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदन देतांना शिष्टमंडळात खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रमोद रेवतकर केंद्रीय सचिव नंदनवार सर जिल्हा अध्यक्षचंद्रपूर रविंद्र जेणेकर, कार्यकारी अध्यक्ष अमित खारकर, , पवन नेते, मनोज तातोडे, प्रमोद रेवतकर, आदिसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.