• Advertisement
  • Contact
More

    पुलावरून पाणी वाहत असल्याने घुग्गुस-धानोरा-गडचांदूर मार्ग बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला

    पुलावरून पाणी वाहत असल्याने घुग्गुस जवळील धानोरा-गडचांदूर मार्ग काल रात्री पासून तिसऱ्यांदा रहदारी साठी बंद करण्यात आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे. मागील 4 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

    घुग्गुस- धानोरा-गडचांदूर मार्गावर अनेक कंपन्या असून 24 तास जड वाहनांची वाहतूक सुरू असते, तसेच या मार्गावर अनेक गावं असून नागरिकांची रहदारी सुद्धा सुरू असते. अशातच मागील 4 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच वर्धा नदीला पूर आल्याने धानोरा- गडचांदूर मार्ग तिसऱ्यांदा राहदरीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून याचा मोठा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पुलाची उंची कमि असल्यमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे गावनागरिकांना

    नौशाद शेख घुग्घुस, प्रतिनिधि सर्च टि, व्ही,