• Advertisement
  • Contact
More

    पूर्वा खेरकर यांना राष्ट्रीय पुरस्कार

    नाशिकच्या क्रीडा संस्कृती फाउंडेशनतर्फे क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
    करणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना दरवर्षी राष्ट्रीय व राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडा मार्गदर्शिका पूर्वा गणेशराव खैरकर यांच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सहभाग व मार्गदर्शन याची दखल घेत क्रीडा संस्कृती फाउंडेशनतर्फे २०२१ चा राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार नाशिक येथे २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात येणार आहे.पूर्वा खेरकर हिला राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.