• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    सिंदेवाही पत्रकार मित्र परिवारतर्फे पेपर टाकणाऱ्या मुलांना रेनकोटचे वितरण. बसपा ,व्यापारी व मुख्याध्यापक संघाची मदत

    (प्रशांत गेडाम )
    सिंदेवाही – शहरात आज १७ जुलै सकाळी बहुजन समाज पार्टी,तालुका मुख्याध्यापक संघ व व्यापारी संघ सिंदेवाही चे वतीने विविध दैनिक वृत्तपत्राचे पेपर वाटप करणाऱ्या मुलांना रेनकोटचे वितरण करण्यात आले पावसाळी दिवसात भर पावसात ओलेचीम्ब होऊनही नियमितपणे रोज सकाळी घरोघरी पेपर टाकुण शिक्षण घेणाऱ्या सिंदेवाही मधिल बहुजन समाजातील गरीब -गरजू व वंचित मुलांना रेनकोट किट्स चे मोफत वितरण बसस्थानक सिंदेवाही परिसरात नुकतेच करण्यात आले .
    याप्रसंगी सिंदेवाही तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व शिवाजी विद्यालय पेंढरी कोकेचे मुख्याध्यापक शिंदे ,ग्रामीण विकास विद्यालय कळमगाव गन्नाचे मुख्याध्यापक जमील शेख , बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष नंदू खोब्रागडे ,बसपा मिडीया प्रभारी जोष्णाताई खोब्रागडे ,तालुका व्यापारी संघाचे उपाध्यक्ष राकेश मोहूर्ले ,बामसेफचे प्रा .भारत मेश्राम,शिक्षण विभाग सिंदेवाहीचे अपंग समवेषित शिक्षणतज्ञ लक्ष्मीचंद गहाने ,महेश मंडलवार ,वृत्तपत्र वितरक विलास धुळेवार ,मोहन येमूलवार व राकेश बोरकुण्ड्वार , सुधाकर गजभिये , प्रा .पिण्टु बेलौरकर उपस्थित होते .