• Advertisement
 • Contact
More

  मूल शहरात पावसाचा कहर, घरात पावसाचे पाणी,नागरिकांनी व्यक्त केला रोष

  मूल ( अमित राऊत )

  चंद्रपूर जिल्ह्यात सतत दोन दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे. यात मूल तालुक्यात सुद्धा सतत दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शहरातील विविध वार्डातील अनेकांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रोड, नाल्या उंच आणि घरे मात्र खाली असल्याने घरात पाणी घुसून संपूर्ण घरातील वस्तू, भांडी, कपडे सर्व पाण्यात निस्ताबुज झाले आहेत. मूल नगर पालिकेच्या नियोजनशून्य कारभार असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. अशातच नगरसेवक सुद्धा येऊन बघत नसल्याने नागरिकांत प्रचंड रोष व्यक्त केल्या जात आहे. नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने नगरसेवक आणि नगरपालिका यांच्यावर स्थानिक नागरिकांचा प्रचंड नाराजीचा सूर दिसत आहे. कोरोणा परिस्थितीमुळे आधीच अठरा विश्व दारिद्र असताना अनेकांना घरकुल नाही, लहान घरे आहेत, या परिस्थितीत घरात पाणी घुसल्याने आणखी जीवन जगणे कठीण झाले आहे.
  मूलच्या स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नुकसान झालेल्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे.

  शहरातील ज्या नागरिकांच्या घरात पाणी गेला, त्यांचे खूप नुकसान झाले आहे, नगर पालिकेचा नियोजन शून्य काम असल्याने नागरिकांना मनस्ताप होत आहे. स्थानिक प्रशासनानाने त्याना मदत करावी.

  गौरव शामकुळे, सामाजिक कार्यकर्ते, मूल