• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  राजगृहावर हल्ल्याचा चंद्रपुरातील नगरसेवकांनी केला निषेध

  भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकासाठी मुंबई येथे प्रशस्त ग्रंथालय बांधले.ते राजगृह म्हणून प्रसिध्द आहे. समस्त आंबेडकरी जनतेचे श्रध्दास्थान असलेल्या या मुंबई स्थित पवित्र राजगृहावर अज्ञात माथेफिरूने हल्ला करून या पवित्र स्थानाची तोडफोड केली. अशा समाजकटकांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी. आणि पुढील काळात अशा प्रकारचे निंदनीय कृत्य होणार नाही याची दक्षता घेवून पोलीस सुरक्षा देवून या पवित्र वास्तुचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी. अशी मागणी करून चंद्रपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ सोशल डिस्टंसिंगचे पालन करून निषेध करण्यात आला.यावेळी नगरसेवक अँड. राहुल अरूण घोटेकर, सविता कांबळे, वंदना जांभुळकर, शितल गुग्मुले, पुष्पा उराडे, चंद्रकला सोयाम, खुशबु चौधरी, सतिश घोनमोडे, श्याम कनकम, स्वप्नील कांबळे, अंकुश चौधरी, मनीष सोनडवले, राजेश थुल, वैभव मेश्राम, सागर तामगाडगे, मंगेश रंगारी, रितीक शेंडे, आदर्श वालके आदी उपस्थित होते.

  Leave a reply

  Please enter your comment!
  Please enter your name here