• Advertisement
  • Contact
More

    राजुऱ्यात ‘कोंगो’ पेपरची सर्रास विक्री ?

    तरुणाई नशेच्या विळख्यात

     सध्या ‘नशा’ करण्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. पण शहरात नशेच्या ‘कोंगो’ पेपरची जोरात चर्चा आहे. या ‘तीन रोलिंग पेपर’ ची शहरातील काही पानटपरीवर सर्रास विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा एक नशेचा प्रकार असल्याने तरुणाईला याचे वेध लागले आहे.     …..’नशा’ ही तरुणाईला लागलेली कीड आहे.कुणी दारूचे व्यसन करून नशा करतात तर काही युवक गांजा,ब्राऊनशुगर यासारख्या घातक पदार्थांचा हुक्का मारून नशा करीत असल्याचे दिसून येत आहे. आता शहरात नशेचा ‘कोंगो’ पेपर प्रकार समोर आला आहे. हा फिल्टरयुक्त असून तीन रोलिंग पेपर आहे.सध्या या पेपर ची किंमत १५ रुपये एवढी आहे.या पेपरला रोलिंग करून त्यात ‘नशिले’ पदार्थ टाकले जाते. गांजा,ब्राऊनशुगर यासारख्या नशायुक्त घातक पदार्थांचा ‘हुक्का’ मारल्या जातो. राजुरा शहरात पेपरची खुलेआम विक्री सुरू असली तर या पेपर मध्ये टाकणारे नशिले पदार्थ कुठून येते असा प्रश्न निर्माण होत आहे. तरुणाईला या कोंगो पेपरने जाळ्यात ओढल्याने अनेक युवक नशेच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे.