• Advertisement
  • Contact
More

    साऊथ RPF च्या पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू बल्लारपुर साऊथ आरपीएफ रेल्वे चौकीतील घटना

    चंद्रपुर :- विरुर पोलीस ठाण्या हद्दीत चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या अनिल गणपत मडावी सोमवार’ला साऊथ आरपीएफ चौकीत आणण्यात आले होते. हाताला दुखापत झाल्याचे कारण देत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री दहा च्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान या आरोपीचा मृत्यू झाला. अनिल गणपत मडावी हा विरुर येथील रहिवाशी असून काल सोमवारला विरुर रेल्वे स्थानकातून सुमारे पंचवीस हजारांच्या तांबे केबल चोरीच्या प्रकरणात अटक करून चौकशीसाठी आरपीएफ’च्या साऊथ रेल्वे चौकी बल्लारपुर येथे आणण्यात आले. दरम्यान रात्री ८ च्या सुमारास हातावर जखम झाल्यामुळे तो बेशुद्ध झाला म्हणून उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याचे पाहता त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
    मात्र, रात्री १० च्या सुमारास या आरोपीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहेत. या मृत्यूची उचस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता पीडित कुटुंबियांकडून करण्यात येत आहेत.