• Advertisement
  • Contact
More

    सर्पदंशाने युवक शेतमजूरचा मृत्यू…..

    सावली(सूरज बोम्मावार) किसान नगर येथील शेतमजूर सुनील सुरेश कुडावले वय 27 वर्ष याचा सर्पदंशाने मृत्यू झाला.
    सदर शेतमजूर हा आपल्या कौटुंबिक उदरनिर्वाह करीता रोजीने शेतमजूर म्हणून काम करायचा. सदर शेतीचा हंगाम असल्याने शेतमजूर हा शेतामध्ये पाणी लावण्याकरिता गेला असता तर त्याच्या हाताला कोब्रा नाग या सापाने तब्बल तीनदा चावा घेतला. सदर ही घटना बाजूच्या शेतकऱ्यांना लक्षात येताच त्याला जिल्हा सामान्य रुग्णालया गडचिरोली येथे भरती करण्यात आले. सदर शेत मजुराच उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत्यू पश्चात आई, पत्नी, दीड वर्षाचा मोठा मुलगा व नुकत्याच जन्माला आलेला दीड महिन्याचा लहान मुलगा आहे. सदर शेतमजूरला आर्थिक भरपाई देण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.