• Advertisement
  • Contact
More

    सावली वनपरिक्षेत्रात बिबट मृतावस्थेत आढळला

    सावली(सूरज बोम्मावार)
    सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील
    विरखल येथील भैयाजी वळूजी देशमुख यांच्या शेतीमध्ये बिबट हा मृतावस्थेत आढळला, त्यांच्या शेतालगत असलेले शेतकरी ढिवरुजी चिमुरकर हे शेतीवर धानपीक पाहण्यासाठी गेले असता देशमुख यांच्या शेतीत बिबट मरून असल्याचे दिसले त्यामुळे घरी येऊन देशमुख यांना बिबट मरून असल्याचे सांगितले, सांयकाळी देशमुख यांनी विलंब न करता बिबट्या मृतावस्थेत असल्याचे वनविभागाला कळविले, त्यामुळे रात्री तालुका वनपरीक्षेत्र अधिकारी वसंत कामडी यांच्या मार्गदर्शनाखाली व्याहाड येथील क्षेत्र सहाय्यक रवी सूर्यवंशी, वनरक्षक मेश्राम, सोनेकर, प्रत्यक्ष पाहणी करून शवविच्छेदन साठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले, यावेळी पुनम झाडे, भैयाजी देशमुख, ढिवरू चिमुरकर, यशवंत बारसागडे आदी उपस्थित होते.