• Advertisement
 • Contact
More

  सायबर चोरट्यांपासून सावधान, अनोळखी माणसाला मोबाईल देऊ नका, क्षणात बँक खाते होऊ शकते साफ!

  माझ्या मोबाइलची बॅटरी संपली, अर्जंट कॉल करायचा आहे, असे सांगून मोबाइल मागून त्यावर ओटीपी घेऊन खात्यातील पैसे गहाळ केले असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे कुणी अनोळखी माणूस मोबाइल मागून फसवणूक करीत असल्यास काळजी
  घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे . सध्या तरी असे प्रकरण जिल्ह्यात उघडकीस आले
  नाही.खात्यामधून पैसे लंपास करण्यासाठी सायबर चोरटे वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहेत. आता हे चोरटे ज्येष्ठ व्यक्तींना हेरून माझ्या मोबाइलची बॅटरी संपली, बॅलन्स संपला. एक अर्जट फोन करायचाय , असे इमोशनल करून फोन मागतात आणि त्यातून ओटीपी घेऊन पैसे गहाळ करतात.

  हि काळजी घ्यावि – आपल्या बँक खात्यासंदर्भातील कोणाला माहिती देऊ नये .बँकेचे अधिकारी कधीच माहिती विचारत नाही . त्यामुळे कोणीही फोन करून खात्याची माहिती विचारल्यास देऊ नये.अनोळखी व्यक्तीचे मेल किंवा मेसेज आल्यास संपूर्ण खातरजमा करूनच ते ओपन करावे.