• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते अटल टिंकरींग लॅब चे उद्घाटन.

    राजुरा :- श्रीमती गोपिबाई सांगाडा पाटील प्राथमिक /माध्यमिक / उच्च माध्यमिक आश्रम शाळा राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते अटल टिंकरींग लॅब चे उद्घाटन करण्यात आले.
    या प्रसंगी बोलतांना आमदार सुभाष धोटे म्हणाले ‘ भारतात महिती व तंत्रज्ञानाचा पाया भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी रोवला आहे. विज्ञान व नवोपक्रमाला चालना दिली. त्यामुळेच आज देशाच्या कानाकोपऱ्यात नवतंत्रज्ञान पोहोचले आहे. शाळांमध्ये संशोधन आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अटल टिंकरिंग लॅब (ATL) ची स्थापना करण्यासाठी काही शाळांची निवड केली आहे. यात श्रीमती गोपीबाई सांगाडा पाटील आश्रम शाळेला या योजनेत जिल्ह्यातून प्रथम संधी मिळाली ही अभिमानास्पद बाब आहे. यामाध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षणाचे प्रात्यक्षिक करता येतील. या अभियानांतर्गत भारत सरकारने देशभरातून ८८७८ शाळांची निवड केली आहे. या प्रयोगशाळांमधून इयत्ता ६ ते १२ वी मधिल विद्यार्थ्यांना कौशल्य शिकवले जाणार आहेत. कोरोणा काळात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर आवश्यक होऊन बसला त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना या दोन शैक्षणिक सत्रात विज्ञान व तंत्रज्ञानाची मोठी मदत झाली आहे.
    या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, सुधाकर अडबाले, ठाकरे, संस्थेचे सचिव प्रकाश जाधव, आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी बेलेकर, गट शिक्षणाधिकारी परचाके, मडकाम, मुख्याध्यापक बाली मोहितकर, संगणक मार्गदर्शक सुमित कुमार, बदल बेले, राम सर, लखन जाधव, शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.