• Advertisement
  • Contact
More

    घुग्घुस परिसरातील बंद कारखान्यावर भंगार चोरांची नजर कुख्यात मुख्यसूत्रधारासह तीन आरोपी फरार

    घुग्घुस येथील एका भंगार चोरास अटक तर कुख्यात मुख्यसूत्रधारासह तीन आरोपी फरार

    घुग्घुस :- दिनांक 26 जुलै रोजी रात्री 11 वाजता दरम्यान ओमटी स्टील प्रा.लि. सि-4 एमआयडीसी ग्रोथ सेंटर ताडाळी येथील बंद कारखाण्यात चोरी करण्याच्या उद्देशाने अज्ञात भंगार चोरांनी प्रवेश करून विद्युत ट्रान्सफार्मर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु सुरक्षा राक्षकांनी आरडा ओरडा केल्याने भंगार चोरांनी पळ काढला.
    फिर्यादी धनंजय विद्यानंद चौबे (39) रा.चंद्रपूर काटा इन्चार्ज हे सकाळी कंपनीत गेले असता ट्रान्सफार्मरचे ऑइल व कापर साहित्य खाली पडलेले दिसले 13 ते 15 लाखाचे नुकसान झाल्याने त्यांनी पडोली पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली तक्रारी वरून कलम 379,511 गुन्हा दाखल करण्यात आला. घुग्घुस येथील भंगार चोर आरोपी दानिश शब्बीर कुरेशी (23) रा. बँक ऑफ इंडिया मागे घुग्घुस यास अटक केली. न्यायालयात हजार केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आणखी तीन आरोपी फरार आहेत. पोलिसांनी कापर साहित्य 45,000 हजार एक टाटा सुमो किंमत 1 लाख रुपये असा एकूण 1 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कंपनी दीपक रुपचंद्र जैन रा. चंद्रपूर यांच्या मालकीची असून चार वर्षांपासून बंद आहे त्यामुळे भंगार चोरांनी बंद असलेल्या कंपन्यांना लक्ष केले आहे.
    भंगार चोर हे रात्री रेडियमचे शर्ट घालून व टोपी घालून कंपनीचा कर्मचारी दिसल्या सारखी वेशभूषा करून भंगार चोरी करीत आहे.
    टाटा सुमो क्र. एमएच 40 पी 712 च्या आतील बसण्याच्या सिटा काढून टाकून ती जागा रिकामी करून त्यात चोरीचे भंगार साहित्य टाकून चोरी करण्यात आली ही सुमो ओमटी कंपनीच्या कापर साहित्य चोरीत आरोपीनी वापरली होती.

    यवतमाळ जिल्ह्यातील शिंदोला जवळील शालिवाना पावर प्लांट 5 ते 6 वर्षांपासून बंद आहे येथून कापर साहित्य भंगार चोरांनी चोरून नेले तसेच घुग्घुस जवळील उसगाव येथील गुप्ता पावर प्लांट हा 5 ते 6 वर्षांपासून बंद आहे येथून अनेक भंगार साहित्य चोरीस गेले आहे.
    पुढील तपास पो.नि. एम.एम. कासार यांच्या मार्गदर्शनात पोहवा. प्रकाश निखाडे करीत आहे.

    नौशाद शेख घुग्घुस: प्रतिनिधि सर्च टि, व्ही,