• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    दीप्ती सुर्यवंशी पाटील बल्लारपूरच्या नवीन उपविभागीय अधिकारी

    बल्लारपूर :- महाराष्ट्र शासनाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी पदाच्या बदल्या नुकत्याच केल्या आहेत. दरम्यान दीप्ती सुर्यवंशी पाटील या बल्लारपूर येथील नवीन उपविभागीय अधिकारी म्हणून येणार आहेत.
    यापूर्वी बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी पदाची सूत्रे संजयकुमार ढव्हळे यांच्याकडे होती. मात्र, त्यांची गोंडपीपरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. तेव्हापासून बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी पद हे रिक्त होते. तात्पुरता प्रभार येथील तहसीलदार संजय आईचंवार यांच्याकडे होता. मात्र आता बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारीपदी दीप्ती सूर्यवंशी पाटील यांच्या नियुक्तीमुळे बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालयातील कामाला गती प्राप्त होणार आहे.