प्रशांत गेडाम – प्रतिनिधी
25 वर्षीय युवकाने झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार गावात मंगळवारी सकाळी दहा वाजता सुमारास उघडकीस आली .
देवनाथ वाढई असे मृत युवकाचे नाव आहे . सोमवारी रात्री सात वाजता दरम्यान देवनाथ वाढई हा घरी भांडण करूण घरून निघून गेला त्यानंतर तो परत आला नाही. त्याच्या घरच्यांनी गाव परिसरामध्ये शोधाशोध केली असता तो आढळून आला नाही. मंगळवारी पहाटे सकाळी दहा वाजता दरम्यान तो पवनपार गावा जवळील मोहाच्या झाडाचा फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. या घटने ची माहिती सिंदेवाही पोलीस स्टेशनला मिळताच त्यांनी तात्काळ घटनेचा व घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी
सिंदेवाही रुग्णालयात पाठविण्यात आले . पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत.