चंद्रपुर :- डेंग्यु डासाच्या अळीची उत्पत्ती घरगुती पाण्याच्या भांडयात होत असल्यामुळे आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. त्याकरीता जनतेने वापरावयाची पाण्याची भांडी कोरडी करुन त्यात पाणी भरावे. पाणी साठे झाकून ठेवण्याबाबत किंवा कपड्याने झाकण्याचे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले.
महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून शहरातील ज्वलंत विषयावर चर्चा करण्यासाठी दर शुक्रवारी ‘संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन मनपाच्या अधिकृत फेसबुक पेज #CMCchandrapur वर चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येते.
शुक्रवार, दि. २३ जुलै २०२१ रोजी दुपारी 1:00 वाजता आयोजित कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल सहभागी होत असून ‘डेंग्यू आजार आणि त्यावरील उपाययोजना’ या विषयावर संवाद साधला.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व तातडीने राबवावी. जेणेकरून किटकजन्य आजार उदा. हिवताप डेंग्यु, चिकुणगुनिया जे.ई, चंडीपुरा इ. आजारांचा प्रार्दुभाव व उद्रेक उद्भवणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले.