• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  गडचांदूर येथे शिवभोजन थाळी चा शुभारंभ,,

  गडचांदूर :- महाविकास आघाडी शासनाची महत्त्वाकांशीयोजना असलेली शिवभोजन थाळी केंद्राचा नुकताच गडचांदुरात शुभारंभ झाला.

  गोरगरीब जनतेला माफक दरावर अर्थात अवघ्या 5 रुपयात पोटाची भूक भागवता यावी, या उदात्त हेतूने शासनाने सदर उपक्रम सुरू केला. कोरपना या आदिवासी बहुल तालुक्यात प्रथमच गडचांदूर या औद्योगिक नगरीत अलीकडेच शिवभोजन थाली केंद्राचे उदघाटन गडचांदुरच्या नगराध्यक्षा सविता टेकाम यांच्या हस्ते पार पडले.
  नगर परिषदेच्या जवळ असलेल्या मेहेर भोजनालय अंतर्गत ही योजना सुरू केल्याचे केंद्राचे संचालक बबलू बनकर यांनी सांगितले, याप्रसंगी काँग्रेसचे नगरसेवक पापय्या पोन्नमवार, गणेश गादीगोणीवार प्रभृती उपस्थित होते,

  गडचांदुर परिसरातील गोरगरिबांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सविता। टेकाम यांनी उद्घाटन प्रसंगी केले.