• Advertisement
  • Contact
More

    तालुका शिवसेनेतर्फे गरजुना मदतीचा हात, चायची टपरी व साहित्य देऊन केली बरोजगाराला मदत

    मूल (अमित राऊत )

    मूल :- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात निर्णायक कामे सुरू आहे, त्याअनुषंगाने आज 27 जुलैला प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करतात. मात्र पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार कोणतेही समारंभ या महाराष्ट्रात पुर परीस्थितीत करू नये. जर वाढदिवस साजरा करायचे असल्यास पूरग्रस्ताना मदत तसेच बेरोजगार , शेतकरी बांधव यांना एक हात मदतीचा द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले होते. त्या अनुषंगाने जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी आज वाढदिवसाचे औचित्य साधून मुल तालुक्यातील गरजुना मदतीचा हात या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. त्यामध्ये मुल येथील बेरोजगार अजय ठाकुरवार एक मोडक्या स्वरूपाचा चहा दुकान चालवित होता. तसेस केरोसिन बंद झाल्यामुळे स्टोमध्ये हल्ली डीझेल टाकुन आपली रोजी कशीबशी काढत होता परंतु वाढते डिझेल चे भाव गगनाला भेदुन गेल्यावर मात्र अजयची कसरत झाली. जिवन कसे जगावे हे समजत नव्हते. त्याबरोबर पत्नी व मुलाबाळाच्या पालनपोषण कसे करावे, ह्या चिंतेने ग्रासून जायचा ही बाब मुल शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांच्या लक्षात आली. त्यांनी अजय चे दुःख समजुन घेत आपल्या स्वखर्चाने मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य मुल येथील गरीब परिस्थितीत जगणारे अजय ठाकुरवार यांना चहा स्टाॅल चे सामान यामध्ये चहा टपरी, सिलेंडर,रेग्युलेटर,लायटर,भांडे,च हा,साखर तसेच संपुर्ण साहीत्य येरोजवार यांनी दिले. तसेच मुल तालुक्यातील गरजु शेतकरी वर्ग यांना खताचे वाटप करण्यात आले. गरजू नागरिकांनी मुल तालुका शिवसेना प्रमुख नितीन येरोजवार यांचे आभार मानले.
    या कार्यक्रमाला यशस्वीपणे राबविण्यात तालुका समन्वयक तथा सुशी सरपंच अनिल सोनुले , उपतालुकाप्रमुख रवी शेरकी , सत्यनारायण अमरूदिवार, सुनिल काळे, महेश चौधरी, शहर समन्वयक अरविंद करपे, उपस्थित होते.